A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

बागला हायस्कूलला विभागीय शालेय ग्रैपलिंग स्पर्धेत 8 स्वर्ण पदक

सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

IMG 20241025 145624

  • :- क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, वर्धा, जिल्हा क्रीडा परिषद, वर्धा व ग्रैपलिंग असोशिएशन ऑफ वर्धा यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी नागपुर विभागीय ग्रैपलिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीड़ा संकुल, वर्धा येथे करण्यात आला. या स्पर्धेत नागपुर विभागाचे वर्धा, भंडारा, नागपुर, गोंदिया, व चंद्रपूर जिल्हे आले होते. याच स्पर्धेत स्थानिक मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथील १९ वर्ष आतील मुले व मुलीनें एकुन आठ विद्यार्थीनी चंद्रपूर मनपाचा प्रतिनिधित्व करून आठ स्वर्ण पदकावर आपले नाव निश्चित केले. या मध्ये कू. मानसी गजेंद्रसिंग दरबार- ४५ किग्रा ,कू . हेमा पवनकुमार देवांगन-५३ किग्रा, कू.रेशमी सुखदेव देवांगन – ४५ किग्रा, कू. जानवी श्रवणकुमार देवांगन – ५३ किग्रा, कू. श्रृथी जगन दुर्गम- ६४ किग्रा त्याच प्रमाणे मुले विभागात रोहित रवी ओड्डेवर – ५२ किग्रा, ओमप्रकाश बबन यादव – ५८किग्रा, रिषभ मोहनलाल पासवान – ६६ किग्रा यांनी आप आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला व समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय ग्रैपलिंग क्रीडा स्पर्धेत आपली जागा पक्की केली. समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत ही दोन्ही गटात विद्यार्थि नागपुर विभागाचे प्रतिनिधित्व करणार. या उत्कृष्ट विजयी कामगिरी साठी बागला चेरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्रजी बागला व मुरलीधर बागला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर यांनी कौतुक केलं. तसेच शारीरिक शिक्षक श्री. मुकेश पाण्डेय सौ. प्रांजलि गर्गेलवर व सौ. संध्या राउत यांचा मार्गदर्शन लाभला. हे खेळाडू आता पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी येथे सराव करत आहे. त्याच प्रमाणे समोर होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बागला हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.
Back to top button
error: Content is protected !!