
संजय पारधी बल्लारपूर, महा.
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य झोकून देणारे इतकंच नव्हे तर अस्पृश्य समाजासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून देणारे महात्मा फुले यांचे समाज कार्य फार मौलाचे होते शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथातून शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या या महामानवाला त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी डॉ. पल्लवी जुनघरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. विनय कवाडे, सह कार्यक्रम अधिकारी रासेयो, डॉ. पंकज कावरे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. किशोर चौरे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.