A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

सन १९३६ या वर्षी स्थापना होऊन आज मस्क-या ( हाडपक्या ) गणपतीला ९०-९१ वर्षे झाली आहे. झेंडा चौक महाल, नागपूर परिसरातील राष्ट्रीय शिवाजी मंडळातर्फे हाडपक्या गणपतीची निरंतर मनोभावे पूजा अर्चना होत आहे.

सन १९३६ या वर्षी स्थापना होऊन आज मस्क-या ( हाडपक्या ) गणपतीला ९०-९१ वर्षे झाली आहे. झेंडा चौक महाल, नागपूर परिसरातील राष्ट्रीय शिवाजी मंडळातर्फे हाडपक्या गणपतीची निरंतर मनोभावे पूजा अर्चना होत आहे.

प्रेस नोट
झेंडा चौक महाल, नागपूर

सन १९३६ या वर्षी स्थापना होऊन आज मस्क-या ( हाडपक्या ) गणपतीला ९०-९१ वर्षे झाली आहे. झेंडा चौक महाल, नागपूर परिसरातील राष्ट्रीय शिवाजी मंडळातर्फे हाडपक्या गणपतीची निरंतर मनोभावे पूजा अर्चना होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही संकष्टी चतुर्थीला येथील शहीद शंकर महाले स्मारक सभागृहात गणपती बाप्पा चे आगमन झाले. मंडळाचे सहसचिव श्री नितीन चौधरी यांचे हस्ते गणपतीची स्थापना करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष श्री ओंकार राउत आणि सचीव श्री गणेश पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली येथे दररोज अतिशय उत्साहात भजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याद्वारे मनोरंजन तसेच समाजप्रबोधन होत आहे. समाजस्तरातील सर्व घटक मोठ्या प्रमाणात येथे भेट देत आहेत. गणेशमूर्ती याही वर्षी अतिशय आकर्षक असून याठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची भजने अनेक वर्षे संपन्न झाली आहेत. समाजातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते दररोज संध्याकाळी आरती होऊन प्रसाद वितरण करण्यात येत आहे. सतत व नियमितपणे गणपती आराधना होत असून याद्वारे समाजात एकतेचा, देशभक्तीचा संदेश जात असतो येथे सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते असून उत्सव साजरा करण्यात श्री दामोदर भट, वसंतराव माथने , सतीश दिक्षित, गोविंद नागपूरे, प्रकाश भिसे ,गंगाधर घुबे , प्रकाश बांते ,विजय लुटे, कृष्णाजी लेदाडे, देवराव अवचट, राजू रामटेके, अशोक निखाडे ,शेषराव दुरगकर ,अनिरुद्ध धारकर, समाजसेवक विनोद इंगोले, माधव हिरुळकर, मनोज वढूळकर, जय कडू, रामदास मरसकोल्हे, ॲड अभय रणदिवे, डॉ नरेशआंबेकर, राजेश हडप, विजय वाटकर, भोंडगे गुरुजी व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!