A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

*आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आपल्या मागण्यासाठी संविधान चौक पुन्हा दणाणून सोडला*

*आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आपल्या मागण्यासाठी संविधान चौक पुन्हा दणाणून सोडला*

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

*आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आपल्या मागण्यासाठी संविधान चौक पुन्हा दणाणून सोडला*
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर – भंडारा जिल्हा तर्फे देशव्यापी मागणी दिनाच्या उपलक्षा मधे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी संविधान चौकामध्ये शेकडोच्या संख्येमध्ये उपस्थित राहून धरणे आंदोलन केले. ३ महिन्यापासून मानधन नाही, इतर कामाचा मोबदला नाही, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही अशा परिस्थितीमध्ये आशा वर्कर व गटप्रवर्तक कशा काम करणार? आशा वर्कर व गटप्रवर्तक भारतातील व राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महत्त्वाच्या दुवा मानल्या जातात. नागरिकांना आरोग्य सेवा त्यांचे घरापर्यंत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती सरकारकडे पाठवण्याचे सुद्धा त्या काम करतात. कोरोनाच्या काळात त्यांच्या कार्यामुळे भारतातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या प्रयत्नाने व परिश्रमाने कोरोनाला हद्दपार करण्यात सफलता मिळवली आहे. त्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना जगात नाव लौकिक मिळालेले आहे. त्यांचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सुद्धा सन्मान केला आहे. परंतु कोरोनाचा काळ असो किंवा इतर वेळ असो स्वतःची किंवा स्वतःचे परिवाराची काळजी न करता नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरता त्या प्रयत्नात असतात. परंतु शासनाच्या निष्ठुर भूमिकेमुळे आजही त्या वंचित असून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवून घेण्याकरता सतत संघर्ष करत असतात. जो त्यांच्या अधिकार आहे. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी १८ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर पर्यंत संप केल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी शासनाने मंजूर केलेल्या मागण्या.
(१) आशा वर्कर यांना ७ हजार रुपये महिना मानधन वाढ.
(२) गटप्रवर्तक यांना १० हजार रुपये मासिक मानधन वाढ.
(३) गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजन करण्यात करता कायदा करणार.
(४) आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना २ हजार रुपये दिवाळी बोनस देणार.
(५) आरोग्यवर्धिनीचा निधी सर्व आशांना मेडिकल ऑफिसर यांच्या सहीने देणार.
(६) गटप्रवर्तक यांना आरोग्यवर्धिनीचे १५०० रूपये महिना मोबदला देणार.
(७) ऑनलाइन डाटा एंट्रीची आशांना सक्ती करणार नाही. परंतु ज्या आशा स्वयं इच्छेने करणार त्यांना विशेष मोबदला देणार.
(८) यू एच एन डी नगरपरिषद व नगरपंचायत अंतर्गत असणाऱ्या आशांना लागू नसल्यामुळे त्याच्या निधीपासून सुद्धा त्यांना मुखावं लागतं. सर्वांना लागू करण्यात यावा किंवा यू एच एन डी रद्द करून रक्कम सरसकट प्रत्येक आशांना देण्यात यावी.
(९) गटप्रवर्तक यांना त्यांच्या कामानुसार अंगणवाडी सुपरवायजर प्रमाणे आशा सुपरवायजर नामोल्लेख करून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा किंवा काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवेत समायोजित करण्यात यावे.
अशा विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे परत १२ जानेवारी ते १मार्चपर्यंत ५० दिवस परत बेमुदत संप करण्यात आला. त्यामध्ये २ दिवस मुख्यमंत्री यांच्या खाजगी निवासस्थानासमोर व २० दिवस आजाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सुद्धा शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर आशा वर्कर यांना ५ हजार रुपये महिना व गटप्रवर्तक यांना १ हजार रुपये महिना नोव्हेंबर २०२३ पासून देण्याचा निर्णय शासनाने केला. परंतु नवीन जीआर नुसार मानधन एप्रिल २०२४ ते जून २०२४ महिन्या पर्यंत देण्याचे पत्र पाठवण्यात आले. शासनाने निर्णय घेताना गटप्रवर्तक बाबतीत मोठा अन्याय केलेला आहे. त्या सीनियर असून त्यांना रोज वेगवेगळ्या गावात दौरे करावे लागतात व पूर्ण रेकॉर्ड किपिंग चे काम करावे लागते. त्याकरता त्यांचे विषयावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. घेतलेला निर्णय अयोग्य असून त्यामध्ये फेरबदल करून ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता शासनाने करावी. या मागणी करता आंदोलन करून जिल्हाधिकारी यांचे मार्फत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांचे नावे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. राजेंद्र साठे, कॉ .प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोत्तेजवार, रंजना पौनीकर, माया कावळे, यांनी केले. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांची नावे जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना प्रिती मेश्राम,रंजना पौनीकर, लक्ष्मी कोतेजवार, माया कावळे, अंजू चोपडे यांनी निवेदन सादर केले.

अध्यक्ष
राजेंद्र साठे
9890090107
9370009560

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

Back to top button
error: Content is protected !!