लक्ष्मण हाके-मराठा आंदोलक यांच्या मध्ये वाद
पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादात आंदोलकांनी हाके यांच्यावर दारू प्यायल्याचा आरोप केला आहे, तर हाके यांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला झाल्याचा दावा केला. हाके यांची मेडिकल चाचणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात हाके यांना त्यांचे सहकारी धरून नेत असल्याचे दिसते. वादानंतर दोन्ही गटांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.