

समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र;
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे . त्या प्रमाणे आज सकाळपासूनच मतमोजणी केंद्र मुल चे समोर मोठ्या प्रमाणात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी तोबा गर्दी केली आहे . मतमोजणी च्या प्रथम फेरी पासून भाजप चे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर असून 6 व्या फेरी अंती भाजप चे सुधीर मुनगंटीवार यांना 18038 मत , महवीकास आघाडी काँग्रेस चे संतोष रावत यांना 15933, आणि काँग्रेस चे बंडखोर अपक्ष उमेदवार अभिलाषा गवतूरे यांना 4980 मत घेऊन सुधीर मुनगंटीवार हे जवळपास 2100 मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र आहे .








