A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव

अहिल्यानगर, दि.१० :- अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला.

संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही श्री.भोईटे यांनी केले आहे.

#अन्नसुरक्षा2026 #FoodSafety #अहिल्यानगर #Ahilyanagar #दूधउत्पादन #DairyInspection #अन्नवऔषधप्रशासन #FDAAction #नागरिकआरोग्य #PublicHealth #अहिल्यानगरअपडेट #AhilyanagarNews

Back to top button
error: Content is protected !!