राजुरा :मारोती काळे
घटनेच सविस्तर वृत्त असं आहे कि राजुरा तालुक्यातील पांढरपौनी या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ती म्हणजे या गावातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकणी गावातील एका 23वर्षीय युवकाला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.त्यांच्या विरुद्ध पास्को अंतर्गत, तसेच अन्य कलमा अंतर्गत अटक करण्यात आली.
यांचदरम्यान त्या अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला.गावातील वर्ग 8वित शिकणारी मुलगी गावातील एका 23 वर्षीय युवकांकडे शिकवणी वर्गासाठी जात होती.यांचदरम्यान औचित्य साधून त्याने लैंगिक शोषण केल्याने मुलीला दिवस गेले. काही दिवसापूर्वी मुलीला पोटात वेदना जाणवल्याने मुलीच्या वडिलांनी तिला दवाखान्यात नेले असता सोनोग्राफीत ती गरोदर असल्याचे डॉक्टर च्या निदर्शनास येताच त्यांनी राजुरा पोलीस स्टेशन ला कळविण्यात आले.सदर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी मुलीचे बयान घेऊन आरोपी विरुद्ध कलम 376(2),376(3),पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून कारागृहात पाठविले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता भुते करीत आहे.