A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

ढोलताशांच्या गजरात जिल्ह्यातील 800 भाविक रामलल्लाच्या दर्शनाकरीता रवाना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर ते अयोध्या विशेष ट्रेन

चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर जिल्हाधिका-यांनी दाखविली ट्रेनला हिरवी झेंडी

सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
जेष्ठ भाविक नागरिकांना, राज्य तसेच देशातील प्रसिध्द तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येकरीता आज (दि.19) रवाना करण्यात आली. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली. राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील 800 भाविकांना अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळी जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिकतेचे दर्शन व्हावे, यासाठी राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची /दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 800 लाभार्थी श्रीराम मंदिर (अयोध्या) करिता पात्र करण्यात आले. 19 ते 23 मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सदर यात्रा पार पडणार आहे. 19 मार्च रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानाकावरुन यात्रेकरूंना घेऊन सदर रेल्वे 20 मार्च रोजी श्रीराम मंदीर अयोध्या येथे पाहोचणार आहे. 21 मार्च रोजी सांयकाळी अयोध्या रेल्वे स्थानकावरुन निघून 23 मार्च रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे.

भाविकांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून आज 800 लोक अयोध्येला रवाना होत आहे. भाविकांसाठी ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यातील नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाची संधी मिळाली आहे.

यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त (समाजकल्याण) विनोद मोहतुरे, तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे दीपक धात्रक, स्मिता बैरमवार, सचिन फुलझेले आदी उपस्थित होते.तत्पुर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ओळखपत्र देऊन त्यांचे स्वातग करण्यात आले.

गत महिन्यात 5 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बौध्दगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील 203 पात्र लाभार्थ्यांनी महाबोधी मंदीर (बौद्धगया) येथे दर्शन घेतले होते.

Back to top button
error: Content is protected !!