
सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा तर्फे आज दिनांक 24 एप्रिल 2025 ला राज्यातील बोगस शिक्षक नियुक्तीच्या चौकशी करिता एसआयटी गठीत करण्याबाबत चे निवेदन माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले. नागपुर विभागात 580 बोगस शिक्षकाची भरती शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केली असून यात शिक्षण संस्थाचालक सुद्धा समाविष्ट आहे.
नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक व त्यांचे काही सहकारी/ अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली असून अनेक भ्रष्टाचारी अधिकारी व संस्थाचालक अजूनही बाहेर आहे.
बोगस शिक्षक नियुक्ती करून शासनाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोषीची सखोल चौकशी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे संपूर्ण राज्यात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत असून सरकारने लवकरात लवकर एसआयटी चे गठन करून सखोल चौकशी करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात येत आहे.
माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देताना आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी *विलास खोंड जिल्हाध्यक्ष, मधुकर मुपीडवार नागपुर विभाग उपाध्यक्ष , वसंत वडस्कर शहर कार्यवाह, विवेक आंबेकर कान्व्हेट प्रमुख, सौ सरिता सोनकुसरे प्राथ. जिल्हाध्यक्ष, विकास नंदुरकर विभाग उपाध्यक्ष प्राथ., देविदास चवले उपाध्यक्ष, संतोष सोनवणे कार्यवाह, सुनील पाचखेडे तालुका अध्यक्ष, व्ही राजुरकर,प्रदिप रत्नाकर जिल्हा कार्याध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.