
जवळके, ता. जामखेड जि. अहिल्यानगर मधील शेतकरी कुटुंबातील राम लक्ष्मण बोराडे व संभाजी लक्ष्मण बोराडे या शेतकरी भावंडांनी 2014-15 साली कमलाई साखर कारखाना करमाळा येथुन शेतकीय अधिकारी शांताराम जगदाळे यांच्या माध्यमातून श्री साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रियल लिमिटेड हिरडगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे ऊस वाहतूक करण्यासाठी पाठवण्यात आले. या ठिकाणी पुढे शेतकीय अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यकाल दोन्ही बोराडे भावनडाकडून ऊस वाहतूक करण्यात आली. ऊस वाहतुकीचा कार्यकाल संपल्यानंतर कष्टाने कमावलेली लाखो रुपयामधून ठराविक रक्कम देण्यात आली उर्वरित लाखो रुपये ही त्या शेतकरी कुटुंबातील भावनांनी कष्टाने कमावलेले रक्कम हिशोब घेताना हिरडगाव येथील श्री साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रियल लिमिटेड मॅनेजमेंट व शेतकीय अधिकारी यांच्या संगणमताने या पाच व्यक्तींच्या नावे 1) शहाजी हांडे 1,56,330 रुपये, 2) बालाजी गिड्डे 93,912 रुपये, 3) मारुती जगताप 1,40,748 रुपये, 4) अशोक पोते 2,97,470 रुपये, 5) संदीप बाळू जाधव 19,337 रुपये एवढी रक्कम ऊस वाहतूक कमी व न करणाऱ्या वाहन मालकांच्या नावे कपात केल्याची माहिती सांगण्यात आली. या भावनांनी कष्टाने कमावलेली रक्कम आम्हाला परत मिळण्यासाठी गेली दहा वर्ष प्रयत्न व पाठपुरावा करत असून कारखाना मॅनेजमेंट संचालक मंडळ तसेच शेतकी अधिकारी यांच्याकडून टाळाटाळ करत गुंतागुंतीचा हिशोब देण्यात आला. विना परवाना अनोळखी व्यक्तींच्या नावे कपात केलेली रक्कम आम्हाला परत मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्याने 2 जुलै 2025 रोजी मा.श्री.राम शिंदे साहेब विधानपरिषद सभापती यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळण्यासाठी मदत मागितली. संबंधित प्रकरणांमध्ये या शेतकरी कुटुंबातील भावंडांना न्याय मिळावा असे आव्हान या दोन्ही भावंडानकडून सरकारकडे करण्यात येत आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक आव्हाने करण्यात येत असून सध्याच्या युगामध्ये अशा शेतकरी कुटुंबातील भावंडांना आपल्या कष्टाचे लाखो रुपये मिळवण्यासाठी दहा वर्ष वाट बघावी लागली असून अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. हे कुटुंब कर्जबाजारी झाले असून या शेतकरी भावंडानसाठी सरकारकडून काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.