
दि. 11 जुलै 25 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलींग करीत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सरहद चौकाकडुन वंडरसिटीकडे जाणाऱ्या रोडवरील नारायणी धाम मंदीराच्या मागील बाजुचे फुटपाथवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे. तात्काळ पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी नारायणी धाम मंदीराच्या मागील बाजुचे फुटपाथवर जाऊन बातमी प्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे निखील सचिन यादव, वय 24 वर्षे, रा. धनकवडी शेवटचा बस स्टॉप, जानुबाई मंदीराजवळ, फाईव्ह स्टार सोसायटी, घर नंबर 189 धनकवडी, पुणे हा त्याचे ताब्यात 50,000/-रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टासह दिनांक 10 जुलै 25 रोजी 20:25 वा मिळुन आल्याने त्याचेकडुन गावठी बनावटीचा कट्टा जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 331/2025, भारतीय हत्यार अधिनियम कलम 3 सह 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयामध्ये पाहीजे आरोपीचा शोध चालु आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. मिलींद मोहीते, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, मा. राहुल आवारे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पचार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.