A2Z सभी खबर सभी जिले की

पत्रकार विशाल अडागळे त्यांची पत्नी व पोलीस मार्शल मस्के हे अनोळखी महिलेच्या मदतीस मध्यरात्री गेले धाऊन.

पुणे :- 18 जुलै 25 रोजी रात्रीचे 11:30 वाजले होते एक महिला गुजरवाडी रोड कात्रज दत्तनगर येथेल एमबी बीएर शॉपीच्या पाठीमागे किराणा शॉपजवळ घरामध्ये नवीन भाडेतत्त्वावर राहण्यासाठी नऊ दिवसापूर्वी आलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले त्यांची चावी हरवली होती. घरमालक गावी असल्याने मोबाईल स्विचऑफ होता एकट्याच दरवाजात उभ्या होत्या आसपास कोणीही नव्हते. योगायोगाने आम्ही नातेवाईकांना सोडण्यासाठी आलो असता हा प्रकार निदर्शनास आला.

    सदर महिलेस एवढ्या रात्री मदतीची आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात आले. त्यांनी माझी चावी हरवली आहे लॉक तोडून द्या अशी मदत मागितली आजूबाजूकडून त्यांची ओळख न पटल्यामुळे करणार काय म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत ड्युटीवर कार्यरत पोलीस मार्शल मस्के यांना कॉल केला असता काही मिनिटांमध्ये कात्रज मार्शल म्हस्के व साळवे हे हजर झाले. त्यांना सविस्तर प्रकार सांगितला त्यांची ओळख न पटल्यामुळे अनोळखी प्रॉपर्टीचे अनोळखी महिलासाठी लॉक तोडने योग्य नाही म्हणून शेवटी आम्ही त्यांना स्वःतच्या घरी घेऊन शेजारी असलेला एक रूम मधे त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. तोच त्यांना शंका आली की मी रिक्षातून उतरली तिथे तर पडली नसेल ना चावी, चावी शोधण्यासाठी गेले असता चावी तिथेच पडलेले होते यामध्ये जवळपास दीड तास गेला. रात्रीचा पावणे एक वाजताच्या जवळपास चावी मिळाली आणि त्या ताईंना घर उघडून त्यांच्या घरामध्ये जाता आले. तोपर्यंत मी विशाल अडागळे व माझ्या पत्नी मोहिनी अडागळे त्यांच्या सोबतच होतो शेवटी त्यांची मदत केली आणि आम्ही रात्री एक वाजता आमच्या घरी आलो. वारंवार अशा घटनास्थळी तत्परतेने उपस्थित राहून सहकार्य करणारे भारतीय विद्यापीठ पोलीस मार्शल मस्के व साळवे यांच्यासहित भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल खिल्लारे यांचेहीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

     रात्री अपरात्री एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांची शहानिशा करून मदत नक्कीच करावी हा माणुसकीचा धर्म कोणीही विसरू नये व मदत करत असताना प्रशासकीय सेवनच सहकार्य घेऊनच मदत करावी असेही आवर्जून पत्रकार विशाल अडागळे यांच्याकडून नमूद करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!