
प्रेस नोट
सावली–चकपिरंजी (जि. चंद्रपूर)
*पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)” चे आभासी उद्घाटन संपन्न*
—————————————- *“कौशल्यविकास हेच भविष्याचे सामर्थ्य — आत्मनिर्भर भारताचा हा नवा टप्पा”मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन*
सावलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेला नवी दिशा
सावली (दि. ८ ऑक्टोबर २०२५):
देशाचे लोकप्रिय, दूरदर्शी व विकासदृष्टी असलेले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP)” चे भव्य उद्घाटन आज आभासी पद्धतीने क्रांतीकारी खुदिराम बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली–चकपिरंजी (जि. चंद्रपूर) येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत करण्यात आले होते. ग्रामीण तसेच शहरी युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने त्यांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील भव्य सोहळ्याला राज्यपाल मा.श्री. आचार्य देवव्रत, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार, तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. मंगल प्रभात लोढा (मंत्री – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.
या प्रसंगी स्थानिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी भूषविले.
कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती जि.प. चंद्रपूर श्री. संतोषभाऊ तंडपल्लीवार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार, ज्येष्ठ नेते देवराव सा. मुद्दमवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पा. गड्डमवार, तालुका महामंत्री तथा नगरसेवक श्री. सतिशजी बोम्मावार, प्राचार्य विजय दुपारे, माजी जि.प. सदस्या मनिषा चिमुरकर, माजी तालुकाध्यक्ष अर्जुन भोयर, सुरज बोम्मावार, मोतीराम चिमुरकर, निखिल सुरमवार आदी मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “मी सावली येथे सतिश बोम्मावार यांच्या कार्यालयात असताना या कार्यक्रमाची माहिती मला मिळाली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. देशाचे लाडके, लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते ‘अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम’ सुरू झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
पुढे बोलताना म्हणाले मी खासदार असताना अतुलभाऊ देशकर यांच्यासह चकपिरंजी येथील या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली होती. त्यावेळी येथे विद्यार्थ्यांना मर्यादित सुविधा होत्या; पण आज येथे जो विशाल बसण्याचा शेड उभारलेला आहे, तो माझ्या प्रयत्नाने झाला, हे पाहून मला विशेष समाधान वाटते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विकास व्हावा आणि विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावेत, ही माझी मनापासून इच्छा आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो.” “आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड आणि कोनसरी प्रकल्पांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सावली तालुक्यातील युवकांनीही औद्योगिक प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम, उद्योगाभिमुख आणि आत्मनिर्भर व्हावे, अशी माझी अपेक्षा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमाद्वारे युवकांना अल्पकालीन औद्योगिक प्रशिक्षण मिळून रोजगार व स्वरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “कौशल्य भारत – सक्षम भारत” या ध्येयदृष्टीला साजेसा असा हा उपक्रम ग्रामीण भागात परिवर्तन घडविणारा ठरणार आहे.




