A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर

आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रयत्नला यश सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार

अहमदनगर ( प्रतिनिधी ) : नगर शहरा भोवती सीना नदी वाहत असून तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सीना नदीचे सुशोभिकरण व्हावे, ही नगरकरांची अनेक वर्षांपासूची मागणी होती. मात्र अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित राहिलेला होता सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्यामुळे तसेच नदीपात्रातील विटभट्ट्या कच्ची व पक्की बांधकामे, भराव टाकून वाढवलेल्या जागा व त्यावर थाटलेले बेकायदेशीर बांधकामे, यामुळे सीना नदीचे पात्र अरुंद होऊन नदीला ओढ्याचे रूप बघायला मिळत होते. नगर शहर व नदीकाठावरील परिसरात थोडयाफार प्रमाणात पाऊस झाल्यास आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चाही झाली. आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सुचविले तसेच नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे आवश्यक असल्याचे सुचविले आहे नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15 व्या वित्त आयोगामार्फत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर केल्याचा जी आर काढून काम मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे.

वंदे भारत टीव्ही न्यूज करीता शहाजी दिघे
Back to top button
error: Content is protected !!