शिरूर अनंतपाळ-शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील रमाई नगर जवळील समाज मंदीर येथे दि.६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन येरोळ गावचे सरपंच सौ सुकुमारताई लोकरे यांनी पुष्प अर्पण करुन करत त्यांना अभिवादन केले तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन
व पुष्प अर्पण करत उपसरपंच
सतीश शिंदाळकर यांनी अभिवादन केले व त्यांच्याच हस्ते तदनंतर ध्वजारोहन करुन ध्वजाला सन्मानपूर्वक सामूहिक
मानवंदना देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास येरोळ गावचे सरपंच सौ सुकुमारताई
लोकरे, उपसरपंच सतीश शिंदाळकर, सोसायटीचे चेअरमन अतुल पाटील गंभीरे, भीम शक्ती संघटनेचे प्रकाश बनसोडे, भाजपचे युवा नेते अमर माडजे, माजी सैनिक बस्वराज शिंदाळकर, अब्दुल मुजेवार, भिवाजी लोकरे, ग्रामपंचायत कर्मचारी बाबुराव वाघमारे, विनोद लोंढे, तसेच होमगार्ड स.स.दासरे, विजयकुमार बनसोडे, सूर्यकांत बनसोडे, नामदेव बनसोडे, बालू वाघमारे, राहुल कांबळे, बालाजी बनसोडे, हरीश बनसोडे, महेश शिंदे, निलेश उमामोड, नागनाथ जाधव, माणिक चौसष्टे, संभाजी कांबळे, नितेश झांबरे, तसेच सर्व गांवकरी मंडळी उपस्थित होते.
2,528 Less than a minute