अहिल्यानगर :अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कै.श्री. नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेचे विद्या विकास पब्लिक स्कूल बाभळेश्वर या विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद मेळाव्यात हजेरी लावली. विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहाने खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी विविध पदार्थाची विक्री ,खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. तसेच पालेभाज्या फळभाज्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी ठेवले होते.यांचबरोबर संसार उपयोगी वस्तू सुई पासून व्हेईकल पर्यत च्या वस्तू प्रदर्शन व विक्री साठी उपलब्ध होत्या.
विद्यार्थ्यांमध्ये बाजारांमधील गोष्टींची माहिती मिळावी तसेच आवक-जावक, पैशाचे चलन, जनरल नॉलेज याचीही माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी आपल्या भाषणात डॉ डांगे व श्री बनकर सर यांनी रावसाहेब म्हस्के व पवार साहेब यांच्याबद्दल माहिती दिली या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा ताण तणाव दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील म्हस्के, डॉ संभाजी डांगे, ऋषींकेश डांगे तसेच संस्थेचे सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, संस्थेचे अधीक्षक श्री जी . टी. गमे सर, व पालक वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक राजेंद्र नालकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
2,506 Less than a minute