A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

मनरेगा अंतर्गत काम पूर्ण होऊनही मजुरांची मजुरी प्रलंबित — तात्काळ निधीची मागणी

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत अनेक कामे पूर्ण होऊनही मजुरांचे वेतन अद्याप जमा झालेले नाही. जानेवारी महिन्यापासून मजुरांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळालेला नसल्याने ग्रामस्तरावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सदर प्रकरणात खालील FTO (Fund Transfer Order) क्रमांकांतर्गत मजुरी प्रलंबित आहे:

📌 MH1809007999_220126APB_FTO_327105

📌 MH1809007999_200226APB_FTO_348453

मनरेगा कायद्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर निश्चित कालावधीत मजुरी देणे बंधनकारक आहे. मात्र, निधीअभावी मजुरी थांबवणे हे नियमांचे उल्लंघन असून यामुळे गरिब मजुरांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

मजुरांचे कुटुंबीय रोजच्या उदरनिर्वाहासाठी या मजुरीवर अवलंबून असल्याने वेतनाच्या विलंबामुळे त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून या बाबीकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.

त्यामुळे संबंधित विभाग व प्रशासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून मजुरांची थकीत मजुरी जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे

Back to top button
error: Content is protected !!