प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर, मालेगाव । चंदनपुरी शिवारात महामार्गा लगत असलेल्या एका बॅटरी विक्री दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत तीन लाख ८० हजार ८०० रूपये किंमतीच्या बॅटरी चोरून नेल्या. गुरूवारी रात्री हा प्रकार घडला.
यासंदर्भात जुबेर गुलाबखान (३४) रा. हिंगलाजनगर, मालेगाव या बॅटरी विक्रेत्यांने किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचे चंदनपुरी शिवारात सिलवर बॅटरी सेंटर नावाचे वाहनाच्या बॅटरी विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे शटर तीघा अनोळखी चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. या चोरट्यांनी तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या तीन लाख ८९ हजार ८०० रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या नवीन बॅटरी चोरून नेल्या. जुबेरखान याने दिलेल्या फिर्यादी नुसार किल्ला पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पोऊनि कोळी हे तपास करीत आहेत.
2,502 Less than a minute