A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल मध्ये जिल्हास्तरीय आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा संपन्न.

WhatsApp Image 2024 07 30 at 18.19.47
संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : छत्रपती शिवाजी महाराज कालीन शिवकला विद्यार्थांनी आत्मसाद करावे – चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन
नुकताच 27/7/2024 तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आष्टेडू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेच्या उद्घाटन माजीअध्यक्ष-वन विकास महामंडळ मा.चंदनसिंह चंदेल जी यांच्या हस्ते दीपप्रज्वन करून करण्यात आले.या प्रसंगी तालुका क्रीडा संयोजक श्री किशोर मोहुर्ले,भाजपा शहर सचिव इंजि.देवेंद्र वाटकर, माजी शिक्षण सभापती सौ जयश्री मोहुर्ले,श्री अनिल पांडे,पत्रकार श्री श्रीनिवास कांदिकुरी, जिल्हा सचिव गुरु गणेश लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. हा खेळ शिवकालीन प्राचीन खेळ असून शालेय खेळामध्ये सुद्धा समाविष्ठ करण्यात आलेला आहे. या खेळाची प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे आयोजन आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन, बल्लारपूर च्या वतीने करण्यात आले.आयोजक अध्यक्ष गुरु गुलाम अहमद शेख, गुरु मनोज डे, गुरु प्रशांत पिंपळे, गुरु सिंधू कुशवाह , गुरु स्वप्निल डंभारे, गुरु परवेज खान, रोहित शर्मा, विवेक शर्मा, समशेर शेख,स्नेहल खैरे, तुषार आत्राम,रितेश निरांजने, वीरांगणा दुबे, वैष्णवी पिंपळे, जानवी कुळमेथे, दिशा कैथवास,सोनम कुशवा, आदीनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहयोग दिला. या स्पर्धेचे संचालन गुरु सिंधू कुशवाह यांनी केले आभार प्रकट गुरु गुलाम अहमद शेख यांनी केले. या स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता . जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Back to top button
error: Content is protected !!