A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

योगनृत्य परिवार भिवापूर चहारे वाडी चा वर्धापण दिन साजरा.

संजय पारधी बल्लारपूर

चंद्रपूर :  योगनृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूर च्या अंतर्गत भिवापूर वॉर्ड चहारे वाडी येथे केंद्राला ऐक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्र प्रमुख आशा परचाके उप केंद्र प्रमुख मेघा चांदेकर शुभांगी नंदनवार् विना भोस्कर ममता चांदेकर मीडिया प्रभारी जितेंद्र इजगिरवार जिल्हा सह प्रभारी प्रमोद बाविस्कर यांच्या प्रयत्नातून प्रथम वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमांस योगनृत्य परिवाराचे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा सल्लागार समिती प्रमुख राधिकाजीं मुंधडा इत्यादी मान्यवारांची प्रमुख उपस्तिती होती फुलांच्या वर्षावात मान्यवारांचं स्वागत करण्यात आले सर्व प्रथम मान्यवारांचे हस्ते द्विप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथीचे स्वागत गीताद्वारे व पुष्प गुछ्य् देऊन सर्वच मान्यवारांचे स्वागत करण्यात आले त्या सोबतच सर्व उपस्तित मंडलं प्रभारी केंद्र प्रमुख त्याच्या टीम सह सर्वांचे स्वागत सत्कार करण्यात आला पुरुष व महिलांची 300 च्या वर उपस्तिती होती प्रस्तावीकातून सरिता दुर्गे माजी केंद्र प्रमुख यांनी मोठया परिश्रमातून केंद्राची सुरुवात केली अनेक संकटावर मात् करीत व हा परिसर स्वच्छ करून महिलांना संघटित करून व वेळोवेळी एसी मेम्बर नी दिलेल्या सहकार्यामुळेच आज या केंद्रात 60 ते 70 महिला पुरुषांची उपस्तिती असते केंद्रातर्फे अनेक सार्वजनिक उपक्रम राबवीत असते असे आवर्जून सांगितले विना भोस्कर ममता चांदेकर ज्योती जागझापे प्रीती खाडिलकर रीना होकम विद्या पुनवटकर रेश्मा चौधरी विद्या मेश्राम प्रिया खांडारकर कल्पना जांभुळकर  इत्यादिनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला उत्कृष्ट संचालन स्वरूपा रामटेके तर आभार प्रदर्शन वैशाली बाविस्कर हिने मानले नास्ता व चहा घेऊन आनंदात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे या कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगेलवार यांनी कळविले आहे

Back to top button
error: Content is protected !!