बलात्कार प्रकरणात आरोपीचे रेखा चित्र जाहीर
पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची श्वानपथकाकडून पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी 10 पथकं तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोंढव्यामध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचं स्केजही जारी केलं आहे. या व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. वंदे भारत लाईव्ह न्यूज पुणे