A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी दाखवली माणुसकीची — अपघातग्रस्त मुलीला तत्काळ रुग्णालयात पोहोचवले*

*माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी दाखवली माणुसकीची — अपघातग्रस्त मुलीला तत्काळ रुग्णालयात पोहोचवले*

प्रेस नोट
गडचिरोली

*माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी दाखवली माणुसकीची — अपघातग्रस्त मुलीला तत्काळ रुग्णालयात पोहोचवले*

गडचिरोली, दि. ०४ नोव्हेंबर २०२५ —
भारतीय जनता पक्षाची गडचिरोली येथील बैठक आटोपून परत जात असताना, चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील आयटीआय चौकाजवळ एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोटारगाडीने एका तरुण मुलीला जोरदार धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. मदतीसाठी आर्त हाका मारत असलेल्या त्या मुलीकडे अनेक वाहनं जात होती, मात्र कुणी थांबण्याचे धैर्य दाखवले नाही.

याचवेळी त्या मार्गाने जात असलेले माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांच्या नजरेस हा प्रसंग पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला वाहन ताफा थांबवला आणि तत्काळ अपघातग्रस्त मुलीकडे धाव घेतली. तिला मदत मिळावी म्हणून त्यांनी स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश कुमार सोलंकी यांना फोन करून घटनास्थळी अँब्युलन्स पाठविण्याचे निर्देश दिले. काही क्षणांतच अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचली आणि त्या जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मा.खा. डॉ. नेते यांनी दाखवलेले हे संवेदनशील आणि मानवी रूप पाहून उपस्थित नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय झाला आहे. “राजकारण करताना माणुसकी हरवू नये” याचे जिवंत उदाहरण मा.खा. नेते यांनी या प्रसंगी घालून दिले. त्यांच्या या तत्परतेने पुन्हा एकदा स्पष्ट केले की,माजी खासदार डॉ. अशोकजी नेते हे फक्त जनतेचे नेते नसून खऱ्या अर्थाने समाजसेवक आणि माणुसकीचे प्रतीक आहेत.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!