आज दिनांक 23/05/2024 रोजी पो.स्टेशन सावनेर हद्दीतील महेश्वरी ले आऊट जीवतोडे हॉस्पिटल जवळ राहणारा ओम जगदीश जनरल स्टोअर्स चालक चींनोरकर हा आपल्या दुकानात गांजा बाळगतो व ग्राहकांना विक्री करतो अशी विश्वसनीय माहिती सावनेर पोलिसांना मिळाली असता,सावनेर पोलिसांनी लगेच घटनेचे गांभीर्य ओळखून ,माहिती वरिष्ठांना दिली असता, वरिष्ठांनी लगेच रेड करण्याचे आदर्श दिले.त्यावरून पोलिस स्टाफनी जाऊन सदर रेड केला असता, त्याचे ओम जगदीश जनरल स्टोअर्स येथे लाकडी रॅकच्या खालच्या कप्प्यामधे एक प्लास्टिक चुंगळीमध्ये गुंगिकरक वनस्पती अंमलीपदार्थ गांजा एकूण 1 किलो 926 ग्रॅम वजन किंमती 20000/- रुपयाचा माल मिळून आल्याने,सपोनि अनिल राऊत यांचे तक्रारी वरून आरोपी नामे जगदीश चीनोरकर वय 62 वर्ष रा.सावनेर यांचे विरूद्ध पोस्टेला अपराध क्रमांक 506/24 कलम 20,22 एन. डी. पी. एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, सहायक पोलिस अधीक्षक सावनेर विभाग श्री अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनात रवींद्र मानकर, अनिल राऊत, व्यंकटेश डोनोडे या सर्वांनी पार पाडली.
2,501 Less than a minute