A2Z सभी खबर सभी जिले की

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय हे खाजगी वाहणांचे वाहन तळ ठरतंय

रुग्णालय प्रशासन सुरक्षा रक्षक यांचे खाजगी वानांना आसरा

oppo_0

अनिल खैरनार

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज

ठाणे जिल्हा प्रमुख

डोंबिवली दिनांक. 09/04/2025 शास्त्रीनगर नगर रुग्णालयात मुख्य आतमधील प्रवेश द्वारा जवळ सुरक्षा रक्षक यांच्या नजरे समोर काही वाहन चालक हे वाहने उभे करून दिसे नासे होतात. तसेच ज्या ठिकाणी हे वाहने उभे केली जातात त्या ठिकाणी मा.मुख्य.वैद्यकीय अधिकारी यांच्या वाहना करिता राखीव असतांना देखील दुसरे वाहन त्या ठिकाणी उभी असतात, तसेच काही खाजगी रुग्ण वाहिका चालक व मालक हे शवाघर येते अवैद्य रित्या रुग्णवाहीका उभे करतात व कोणत्याही प्रकारची संघटना नोंदणी नसतांना मूर्त वेक्ती च्या नातेवाईकांना जास्त पैसे मांगणी करत असतात. ह्या सर्व कामात श्वाघर मध्ये काम करणारे कर्मचारी देखील सहभागी असून, खाजगी रुग्णवाहीका ह्या देखील रुग्णालयाच्या आसपास लावण्यास मनाई करण्यात असमर्थ आहेत. काही रुग्णवाहीका ह्या खाजगी वाहन असून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित केल्या आहेत, त्यांचे दास्तावेज देखील अपूर्ण असून. तरी देखील रुग्णवाहिका ह्या बाहेर गावी, पर राज्यात  मृत्यांचे नातेवाईक यांच्या जीवाशी खेळून शव घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येतात.तरी देखील सुरक्षारक्षक ह्या बाबत नजर अंदाज करत आहेत.तसेच रुग्णालयाची सुरक्षा वेवस्था हि एरनीवर गेली असल्याचे माघेच समोर आले असतांना देखील रुग्णालय प्रशासन हे हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे रुग्ण व नातलग यांचे म्हनणे आहे. काही महिन्या पूर्वी चिंतामण पस्टे नामक सुरक्षा रक्षक हार्दिक त्याच्ये कर्तव्य नंबजावता मुख्य द्वारा जवळील बाकेवर गाड झोपेत असतांनाचा व्हिडीओ वायरल झाला होता. तरी देखील तोच कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहे. उदवाहन चालक हार्दिक उडवाहनत कार्यरत दिसतनाही तर इतर ठिकाणी ओपिडी मध्ये येणाऱ्या महिला रुग्ण यांच्याशी जवळीक करण्याचे कर्तव्य हे महाशय करत असतांनाचे चित्र समोर येत आहेत. तसेच काही बाहेरील गुंड व विकृत वेसनी ते देखील महिलांची ओळख कडून त्यांच्या जवळ संपर्क क्रमांक घेण्याचे समोर आले आहे. हेच वेक्ती महिला कर्मचारी यांच्या बरोबर देखील असभ्यतेणे बर्ताव करत असल्याचे सांगण्यात येते.रुग्णालय मधील काही कर्मचारी व बाहेरील इसम हे मध्यपान रुग्णालयात करत असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. तरी देखील रुग्णालया प्रशासन हे ह्या बाबत दुर्लक्ष करत असल्याने रुग्णालयाची अवस्था हि खाजगी वाहन तळ व मध्यपान करण्याचे ठिकाण झाले काय? असे दिसतय हे सर्व कधी बंद होईल याची प्रतीक्षा सामान्य नागरिक करत आहेत.


Discover more from Vande Bharat Live Tv News

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!