
पुणेः वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातुन दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत सुरु असलेल्या तपासात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन पथकाने चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. शंकर भरत देवकुळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. पार्क केलेल्या वाहनांची शंकर देवकुळे हा बनावट चावी लावून वाहन चोरी करत होता. चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी १३ दुचाकी वाहन आणि दोन ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत.











