A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

WhatsApp Image 2024 12 06 at 16.01.43

संजय पारधी चंद्रपुर, महाराष्ट्र
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 6 डिसेम्बर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रम पार पडला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ रजत मंडल महात्मा फुले महाविद्यालय, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला लाभलेला असा अनमोल हिरा असून ज्यांनी या देशाचं भूतकाळचं काय तर वर्तमान व भविष्याविषयींची तरतूद केली तसेच भारतीय संविधानाच्या माध्यमातून दलित सोशित, पीडिताच्या अधिकाराचे रक्षण केले. ” या कार्यक्रमाचे संचालन डॉ. किशोर चौरे तर आभार प्रदर्शन प्रा. दिवाकर मोहितकर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. दिपक भगत, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!