A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुणे शहरातील दामिनी मार्शल ठरल्या अनेकांसाठी वरदान. म.पो.शि. श्रुती वैभव कढणे(9396) यांनी 250 पेक्षा जास्त कार्यशाळा घेऊन उत्कृष्ट कामगिरी.

IMG 20250824 WA0007

पुणे: 24 ऑगस्ट 2025.

पुणे शहरातील दामिनी मार्शल हे ठरले अनेकांसाठी वरदान. कोथरूड पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दामिनी मार्शल म.पो.शि श्रुती वैभव कढणे (9396) यांनी आपल्या कर्तव्यादरम्यान सुरक्षेच्या उपायोजना संदर्भात 250 पेक्षाही जास्त कार्यशाळा घेऊन मुलींना, महिला, शाळा कॉलेजे, होस्टेल या ठिकाणी भेट देऊन सुरक्षेच्या उपायोजना संदर्भात मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.

IMG 20250824 WA0032 IMG 20250824 WA0037

हेल्पलाइन नंबर 112, 1091 बाबत शाळा, कॉलेज, होस्टेल मधील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, सेल्फ डिफेन्स, प्रात्यक्षिक मार्गदर्शन, पॉस्को अंतर्गत कायदे रागीन छेडछाड पाटला असे प्रकार घडत असल्यास संपर्क साधून पोलीस मदत घेण्याचे आव्हान करण्यात आले.
कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये मिसिंग महिला पुरुष लहान मुले मुली तसेच जेष्ठ नागरिक पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हरवलेले व्यक्तींना नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात अनेकदा यश आले.

IMG 20250824 WA0035 IMG 20250824 WA0033 IMG 20250824 WA0038 IMG 20250824 WA0028 IMG 20250824 WA0023 IMG 20250824 WA0025 IMG 20250824 WA0024

दामिनी मार्शल म. पो.शि. श्रुती वैभव कढणे यांनी सांगितले की वरील कार्य हे कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या सहकार्याने करण्यात आले असून यापुढेही जनहीतार्थ कार्य करण्यासाठी दामिनी पथक तत्पर राहील.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!