A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

पुणे ते छ.संभाजीनगरला जोडण्यासाठी बेलापुर-लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करावा...

पुणे ते छ.संभाजीनगरला जोडण्यासाठी बेलापुर-लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करावा...

प्रेस नोट
बेलापूर,श्रीरामपूर
अहिल्यानगर

पुणे ते छ.संभाजीनगरला जोडण्यासाठी बेलापुर-लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग करावा…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत देण्यात आलेल्या निवेदनाची अधिक माहिती अशी की,रेल्वे विभागाने नुकताच नाशिक पुणे अहिल्यानगर – शिर्डी मार्गे रेल्वेमार्ग लोकसभा अधिवेशनात घोषित केला.हा मार्ग अतिशय योग्य असुन चाकण ते शिरुर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा यात जोडला जाणार आहे या मार्गामध्ये आम्ही थोडासा विस्तार सुचवत आहोत छ. संभाजीनगर-मनमाड रेल्वेमार्गावरील एक व्यापारी पेठ लासुर स्टेशन (LSR )ते बेलापुर (BAP) हा साधारण ५० किलोमिटरचा नवीन रेल्वेमार्ग सुरु केला तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचे औद्योगिक शहर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी व मोठे आयटी पार्क्स असलेले औद्योगिक शहर पुणे तसेच भारताचे वाईन कॅपिटल म्हणून गौरव असलेले व कुंभमेळ्याचे तिर्थक्षेत्र नाशिक हि तिन्ही शहरे एकमेकांना रेल्वेने जोडली जातील.
हा लोहमार्ग बेलापूर स्टेशन (श्रीरामपूर) ते लासुर स्टेशन साधारण ५० किलोमीटर चा असुन पैकी ५ किलोमीटर पर्यंत ब्रिटिश कालीन साखर कारखाना बेलापूर शुगर कंपनी पर्यंत रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे.त्याची फक्त डागडुजी करण्याची करण्याची गरज आहे.या ५ किमी लोहमार्गाचे भुमी अधिग्रहण ही झालेले असुन हा रेल्वे मार्ग आपण केल्यास या परिसरातील विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल म्हणून या नगर शिर्डी नाशिक लोहमार्ग करताना बेलापूर स्टेशन ते लासुरस्टेशन या विस्तारित मार्गाची उभारणी करावी.
अहिल्यानगर जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा आहे बेलापूर स्टेशनचा मालधक्का हा श्रीरामपूर कांदा मार्केट पासुन काही मिटर अंतरावर आहे. तसेच श्रीरामपूर हुन ब्रिटिश काळापासून साखर वाहतूक बेलापूर स्टेशनवरूनच होते आज साखरेबरोबरच मळी स्पिरीट यांची वाहतूक होते तसेच उत्तर नगर जिल्ह्यासाठी खते बेलापूर स्टेशनवरच येतात.
बेलापूर स्टेशन म्हणजेच श्रीरामपूर शहर हा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचे नवीन जिल्हा मुख्यालय असणार आहे. तसेच बेलापूर रेल्वेस्टेशनकडे मोठी जागा ब्रिटिशांनी अधिग्रहित केलेली आहे.त्यामुळे नवीन अधिग्रहण करण्याची गरज नाही. तसेच चांदेगाव- नागमठाण येथे गोदावरी नदीचे पात्र खडकाळ असल्याने तेथे रेल्वे पुलासाठी योग्य जागाही उपलब्ध आहे.या सर्व पार्श्वभूमीवर वरील विस्तारित मार्ग करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर खालील मंडळींच्या सह्या होत्या.
सुरेश पांडुरंग ताकेपाटील ,अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,अहिल्यानगर जिल्हा (उ)
अध्यक्ष,भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती श्रीरामपूर,जितेंद्र आबासाहेब पा. भोसले अध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष अहिल्यानगर,संतोष जाधव, शेतकरी नेते , मा. अर्थ व बांधकाम सभापती ,जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर,भरत रामकृष्ण आसने ,संपर्क प्रमुख, भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती श्रीरामपूर.दत्तात्रय पा.लिप्टे,तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रीरामपूर,कॉ.गोविंदराव पा.वाबळे,संदीप पा.गवारे,दिलीप गलांडे,किरण बाबुराव ताके उंदीरगाव.
ॲड.प्रमोद बिहानी,निखिल राजेंद्र तांबे नागमठाण,जिल्हा छ. संभाजीनगर,प्रविण ज्ञानेश्वर चव्हाण,नागमठाण,जिल्हा छ. संभाजीनगर पंकज रविंद्र चव्हाण,नागमठाण
जि.छ.संभाजीनगरअर्जुन दत्तु साबणे,नागमठाण जि.छ. संभाजीनगर,गणेश भाऊसाहेब ठोंबरे,छत्रपती संभाजीनगर,अनिल रोकडे, अजय गाडेकर,संजय भनगडे ,केपीराज क्षत्रिय,रामदास वाकचौरे, सुभाष गायकवाड,जयेश निकम हे रेल्वे विभागाला निवेदन देण्यासाठी उपस्थित होते

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!