संजय पारधी बल्लारपूर
महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चा बारावीचा निकाल 92 टक्के लागलेला आहे . इंग्लिश मीडियम कॉमर्स आणि मराठी मिडीयम कॉमर्स चे एकूण विद्यार्थी जे बारावीच्या परीक्षेकरता बसलेले होते त्यामध्ये इंग्रजी माध्यमाची रूपविंदर कौर ही प्रथम आलेली आहे तिला 62% मिळालेले आहे तसेच मराठी माध्यमाचा समीर सोनूरले याला 72 टक्के मिळालेले आहे. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर सर आणि प्राचार्य चव्हाण सर तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.