कळमेश्वर तालुक्यातील मोहपा बुधला मधुगंगा तलावातून केबल मोटार चोरी
मधुबंगा तलावात चोरांचा थरार
शेतकरी कोमात आणि चोरटे जोमात
शेतकराच्या माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील मोहपा बुधला तलाव मधूगंगा येथून चोरांनी मोटार व केबल चोरून नेले दिनांक 18.5.24. ला रात्री च्या सुमारास मधुगंगा तलावातून मोटर व पूर्ण केबल चोरीला गेले मधुगंगा हा तलाव 150 ते 200 शेतकऱ्यांना पाणी पुरवतात शेतकऱ्यांना संत्रा मोसंबी गेहू भाजीपाला व पिण्यासाठी पाणी आजूबाजूच्या गावांना या तलापासून मदत मिळते आहे यामध्ये शेतकरी आपली मोटार पंप लावून शेतीमधून उदरनिर्वाह करतात पण काही चोरटे यांनी शनिवारच्या रात्री केबल व मोटार चोरून नेलेली आहे या अगोदर पण त्या मधुगंगा तलाव मधून मोटार व केबल नेलेले आहे शेतकऱ्यांच्या माहितीनुसार मोहपा पोलीस चौकी येथे तक्रार करण्यासाठी गेले असता त्या पोलीस चौकीला कुलूप लावून होते चौकीमध्ये कोणताही अधिकारी होते नाही त्या चौकीमध्ये पोलीस प्रशासन सुद्धा राहत नाही असे शेतकऱ्यांचनी सांगितलेले आहे या गोष्टीचा शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो (टीप ) शेतकऱ्यांनी परत केबल आणि मोटारी विकत आणून दुरुस्तीचे काम केले व पुन्हा संत्रा व मोसंबीच्या झाडांना पाणी देण्यासाठी सुरुवात केली पुढील काही शेतकऱ्यांची नावे आहेत1 मिलिंद यावलकर उपसरपंच मॅसेपठार 2विलास चार्जन 3उदय अंजनकर 4
पुरोशात्तम पोतले 5 जीवन श्रीखंड 6 शंकर भोयर 7 विलास गुळाडे 8 गुणवंत राऊत 9.अनिकेत राऊत अशा या काही शेतकऱ्यांची नावे आहेत आणखी काही आजूबाजूच्या गावचे शेतकरी आहे शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागतो प्रशासनाने याची काही उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची मागणी…..???
चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी