मिळालेली माहिती अशी, शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये एका विषयावर वाद होऊन कल्याण शिवसेना शहरप्रमुख शिंदे गट महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या सुरक्षरक्षकाने गोळीबार केल्याचे बोलले जात असून गायकवाड व सुरक्षारक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जगताप यांच्या कॅबिन मध्ये शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचे साथीदार राहुल पाटील व भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्ये एका विषयावरून सुरवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ व गोळीबार झाला. यामध्ये महेश गायकवाड यांना ४ तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. यांप्रकाराने खळबळ उडून दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकच गोंधळ पोलीस ठाणे व परिसरात घातला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिन मध्ये रात्री अंदाजे १०/११ वाजता दरम्यान हा गोळीबार झाला असून यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्या हाणामारी झाल्याचे प्रकार झाले. असे पोलिसांचे म्हणणे आहे. आमदार गणपत गायकवाड व सुरक्षा रक्षक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.